व्यापाऱ्यांचे अपहरण करणारे 24 तासांत गजाआड

आठ जणांची टोळी अटकेत : दीड लाखांचा मुद्देमालही जप्त
कोल्हापूर – एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी इचलकरंजी इथल्या गारमेंट व्यावसायिक रामकृष्ण रामप्रताप बाहेती (वय 45) यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी 24 तासांत आठ जणांना अटक केली आहे.

अक्षय शिंदे, गौरव पोईपकर, विकास गोईलकर, अतुल कामते, शहारूख महामूद सनदे, शक्‍ती जाधव, महेश यादव, सुबोध शेडबाळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून अपहरणासाठी वापरलेली कार (एमएच10 बीए 6988) व दुचाकी (एमएच 09 डीक्‍यू 45) असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री 12.15च्या सुमारास बाहेती नाकोडानगर येथून घरी जाताना कारमधून पाच जणांनी मारहाण करून त्यांना शहापूर, कोरोची, हातकणंगले मार्गे पेठवडगावला नेले. त्यांच्याकडील सोन्याची चेन, घड्याळ, मोबाईल, अंगठी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल काढून घेतला. यावेळी जिवे मारण्याची धमकी देऊन मुलाकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली.

दरम्यान, हातकणंगले पोलिसांची रात्रगस्तीची गाडी पाहून अपहरणकर्त्यांनी बाहेती यांना वाटेतच सोडून पलायन केले. त्यानंतर बाहेती यांनी गावभाग पोलिसांना प्रकार सांगितला. पोलिसांनी संशयितांचे रेखाचित्र बनवले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण इचलकरंजी, गावभाग पोलीस यांची पथके शोधासाठी रवाना झाली. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे लोकेशनही तपासण्यात आले. अपहरणकर्ते शिरदवाड हद्दीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांनी खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे तानाजी सावंत, गावभागचे निरीक्षक मनोहर रानमाळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अमोल माळी, सचिन पंडित, युवराज सूर्यवंशी, राम गोमारे, महेश कोरे आदींसह पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)