व्यापार विषयक बाबींवर पंतप्रधान मोदींशी ट्रम्प यांची दूध्वनीवरून चर्चा 

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून व्यापार विषयक बाबींवर चर्चा केल्याची माहिती आज व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्याने दिली. व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी पत्रकारांना सांगितले की भारत हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. भारताच्या मालावर अमेरिकेत लागू करण्यात आलेल्या करांमुळे दोन्ही देशांमध्ये या विषयावरून काही वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी मोदींशी चर्चा केली. आम्ही हा विषय चर्चेच्या मार्गाने सोडवू इच्छितो असे त्यांनी सांगितले.

मात्र त्यांच्यात नेमक्‍या कोणत्या मुद्‌द्‌यांच्या अनुषंगाने चर्चा झाली याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.
अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या मालावर भारतात मोठ्या प्रमाणात कर लागू केले जातात त्यामुळे अमेरिकेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अमेरिकेनेही भारताच्या अमेरिकेत येणाऱ्या मालांवरील कर सवलती रद्द करून त्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारणी सुरू केल्याने दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तथापी या विषयावर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये व्यापक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती भारताचे वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी शनिवारी दिली आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला 47.9 अब्ज डॉलर्सची निर्यात केली केली होती तर आयातीचे प्रमाण मात्र 26.7 अब्ज डॉलर्स इतकेच होते. व्यापारातील हे संतुलन भारताच्या बाजुने आहे. अमेरिकेला त्यातून समोताल साधायचा आहे. त्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे भारताची स्थिती अवघड होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)