व्यापार युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर डब्ल्यूटीओची बैठक

नवी दिल्ली -जागतिक व्यापार परिषदेची सर्वात मोठी अनौपचारिक बैठक मंगळवारी नवी दिल्ली येथे सुरू झाली. या बैठकीत 52 सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि जागतिक व्यापार परिषदेचे महासंचालक रोबर्टो एझवेदो सहभागी झाले आहेत.
27 देशांचे मंत्री आणि उपमंत्री या बैठकीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. या बैठकीमुळे, जागतिक व्यापार संघटनेतल्या सदस्य राष्ट्रांना मुक्त आणि विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळेल, अशी आशा प्रभू यांनी व्यक्त केली.ही बैठक आयोजित केल्याबद्दल सर्व प्रतिनिधींनी प्रभू यांचे आभार मानले.

या बैठकीत जागतिक व्यापाराच्या विविध विषयांवर चर्चा होणार आहेत. जागतिक व्यापार संघटनेमार्फत बहुराष्ट्रीय व्यापार पुन्हा सुरू करण्याविषयी चर्चा केली जाईल. अगोदरच जागतिक व्यापार संघटनेच्या कार्यशैलीबाबत अमेरिकेकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या या संघटनेत बदल करण्याची मागणी अमेरिकेकडून करण्यात आली, असे डब्ल्यूटीओचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्टो एझवेदो यांनी म्हटले. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापाराचे वातावरण काही प्रमाणात धोकादायक आहे. संघटनेने सदस्यांबरोबर मुक्त व प्रामाणिकपणे चर्चा करण्याची मागणी केली. संघटनेत अंतर्गत व बाहेरून अनेक समस्यांना तेंड द्यावे लागते.

व्यापारासाठी नियम करण्यात आल्यानंतर त्यात सुधारणा झाल्याचे अमेरिकेचे मत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही पहिली बैठक आहे. या विषयावर विविध देश आली बाजू मांडण्याची शक्‍यता आहे. जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रोबर्टो एझवेदो सध्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्याशी आज विविध विषयांवर चर्चा केली. बहुस्तरीय व्यापारी यंत्रणा पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत एझवेदो यांनी भारत सरकारचे आभार मानले. ही व्यवस्था पुन्हा सुरू करण्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)