व्यापार युद्धाच्या आव्हानासाठी सरकारकडून उच्चस्तरीय समिती 

नवी दिल्ली: जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या व्यापार युद्धामुळे आलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि देशातील वस्तू, सेवांची निर्यात वाढविण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ही समिती स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारासाठी कठीण कालावधी असूनही वस्तू आणि सेवा व्यापारात भारताचा हिस्सा वाढविण्यासाठी उपलब्ध मार्गांचा विचार करण्यात येईल. द्वीपक्षीय व्यापार संबंधांमध्ये दबाव हटविणे आणि नवीन पिढीतील निती निर्माण करण्यावर काम करण्यात येईल.
जागतिक पातळीवरील व्यापारात असणाऱ्या परिस्थिती, वेगाने वाढणारी संरक्षणवादी प्रवृत्ती आणि व्यापार मोर्चावर काही देश सहयोग करत नाहीत, त्याची कारणे शोधण्यात येतील. ओक्‍सस रिसर्च ऍण्ड इन्व्हेस्टमेन्टचे संचालक सुरजीत एस. भल्ला हे या समितीचे अध्यक्षपद भूषवतील. ही समिती भविष्यातील व्यापार नितीसाठी आवश्‍यक त्या सूचना देतील. c

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)