व्यापारातील तूट भरून काढण्यास चीन सहकार्य करणार

वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांची माहिती
नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात चीनच्या बाजूने मोठी तूट आहे. तथापी ही तूट भरून काढण्याची तयारी चीनने दर्शवली आहे अशी माहिती वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी आज येथे दिली. ते म्हणाले की त्यासाठी भारतीय मालाला चीन मध्ये मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध करून देण्यास चीन तयार झाला आहे तसेच भारतीय कंपन्यांच्या सेवांचाही चीन मध्ये वापर वाढवला जाणार आहे. भारतात इंडस्ट्रियल पार्क उभारण्यासही चीन तयार आहे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की चीनचे वाणिज्य मंत्री झोंग शान यांच्याशी आपली याविषयावर चर्चा झाली. त्यावेळी भारत आणि चीन यांच्यातील व्यापारात चीनच्या बाजूकडून मोठी तूट निर्माण झाल्याचे आपण त्यांच्या निदर्शनाला आणून दिले. चीनी मालाला भारतात मुक्त वाव दिला जात आहे पण तितका वाव भारतीय मालाला चीनच्या बाजारपेठांमध्ये दिला जात नाही असे आपण त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर त्यासाठी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे असे प्रभु म्हणाले. भारतातील कृषी माल.

ओैषधे आणि अन्य मालाला चीनमध्ये बाजार पेठ उपलब्ध करून देण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यासाठी दोन्ही देशांतील व्यापारविषयक थेट संपर्क प्रस्थपित करण्यासही चीन तयार झाला आहे असे त्यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भारतीय सेवा कंपन्यांच्या सेवाही चीनला मोठ्या प्रमाणात पुरवून दोन्ही देशांमधील ही तूट भरून काढली जाऊ शकते असेही ते म्हणाले. अशा प्रकारची तयारी चीनने दर्शवण्याची ही पहिलीच वेळ आहे हेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)