व्यापाराच्या बाबतीत युरोपकडून अमेरिकेवर अन्याय

ट्रम्प यांनी दिला विपरीत परिणामांचा इशारा
लंडन – व्यापाराच्या बाबतीत युरोपियन समुदायाकडून अमेरिकेवर अन्याय केला जात आहे. या समुदायाच्या संबंधात आम्हाला अनेक समस्या आहेत. त्यावर त्यांनी योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा मला यात काही तरी मोठीची कृती करणे भाग पडले असा सज्जड इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ब्रिटनच्या एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा जाहीर इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी युरोपियन समुदायाला असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ते म्हणाले की मला युरोपियन समुदायाविषयी अनेक समस्या आहेत. विशेषत: व्यापाराच्या बाबतीत त्यांच्याकडून अमेरिकेवर अन्याय केला जात आहे. त्यांनी त्याविषयी योग्य ते उपाय योजले पहिजेत अन्यथा मला त्यांच्या बाबतीत काही तरी वेगळी कृती करावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत त्यांनी तेथे अमेरिकेची भूमिका स्पष्ट करताना अमेरिका फर्स्ट हेच धोरण कायम ठेवले. त्या अनुषंगाने त्यांनी युरोपियन समुदायालाही काही इशारे दिले.

अमेरिकेबाबतच्या संबंधांबाबत त्यांनी न्यायाने वागावे विशेषत व्यापाराच्या संबंधातील त्यांचे धोरण हे अमेरिकेवर अन्याय करणारे आहे असे त्यांनी डावोस येथेच अनेक वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते आता त्यांनी थेट युरोपियन समुदायाला मोठ्या कारवाईचाच इशारा दिला आहे. ते म्हणाले की आमच्या उत्पादनांना युरोपियन राष्ट्रांमध्ये मोठा वाव मिळत नाहीं आमच्या वस्तु तेथील बाजारपेठेत नेऊन विकणे हे अत्यंत जिकीरीचे बनले आहे पण त्यांच्या वस्तु मात्र ते येथे बिनदिक्कतपणे आणू शकतात. त्यांच्यावर येथे अत्यंत कमी दर आकारला जातो पण आम्हाला मात्र युरोपात अशी सवलत मिळत नाही ट्रम्प यांची तक्रार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)