व्यापारवाढीसाठी प्रयत्न करा…

पंतप्रधान कार्यालयाच्या वाणिज्य मंत्रालयाला सूचना 

नवी दिल्ली -आयात आणि निर्यातीत येणारे सर्व अडथळे वेगाने दूर करा. यासाठीच्या परवानग्या ऑनलाइन देण्याची व्यवस्था करा. त्यामुळे भारतात उद्योग करणे अधिक सुलभ झाले पाहिजे, असे पंतप्रधान कार्यालयाने उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाला सांगितले आहे. भारतातील उद्योगाबाबतचे वातावरण बरेच चांगले झाले आहे. त्यामुळे अशा 190 देशांच्या यादीत भारत आता 100 व्या क्रमांकावर आला आहे. मात्र, विदेश व्यापारात भारत 190 देशांच्या यादीत अजूनही 146 व्या क्रमांकावर आहे. ही परिस्थिती सुधारण्याची गरज असल्याचे पंतप्र्रधान कार्यालयाने सांगितले आहे. भारताला या क्षेत्रातील गुणानुक्रम फारसा चांगला नाही तो सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे.
आता वाणिज्य मंत्रालयातील अधिकारी कामाला लागले आहेत. आयात किंवा निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक वेगाने होण्याची गरज असते. मात्र, भारतात याबाबत परिस्थिती समाधानकारक नाही.

ती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आता वाणिज्य मंत्रालयाने या क्षेत्रातील सर्वाना कामाला लागण्यास सांगितले आहे. बंदरे, सीमा शुल्क विभाग, विविध मंजुऱ्या देणारे विभाग याना तसे पत्र पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर शेजारी देशांशी व्यापार तुलनेने सोपा असतो. तो वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच परिस्थिती बदलू शकते. यासाठी लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी करून आता ती तीनवर आणण्यात आली आहे. मात्र, हे तीन परवाने मिळण्यास उशीर लागतो. तो कमी करण्याची गरज आहे, असे निर्यातदारांनी सांगितले आहे. हे काम पेपरलेस करण्याच्या शक्‍यतेचा वेगाने विचार करण्यास पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे. यामुळे आयात आणि निर्यात करणाऱ्याचा वेळ आणि खर्च कमी होणार आहे. जागतिक बाजारात खर्च वाढून चालत नाही. बंदरातून माल बाहेर काढण्यासाठी काही दिवस लागतात. या यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे. तसे बंदर विभागाला कळविण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यापासून भारताची निर्यात वाढत असली तरी आयात त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे व्यापारात तूट वाढत आहे. जागतिक वातावरण निर्यातीसाठी फारसे चांगले नाही. अशा परिस्थितीतही कार्यक्षमता वाढवून निर्यातीला चालना देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)