व्यापारयुद्ध रोखण्यासाठी प्रयत्न हवे

जागतिक व्यापार व गुंतवणूकविषयक वातावरण बिघडेल

मुंबई – गेल्या पंधरवड्यात भडकलेल्या व्यापारयुद्धामुळे जागतिक वातावरण खराब झाले आहे. त्यामुळे जागतिक व्यापाराचे अब्जावधी डॉलरचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हे युद्ध थांबावे याकरिता भारत सरकारने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने सांगितले आहे.

अमेरिकेने एकतर्फी काही वस्तूंवर आयात शुल्क वाढविले आहे. त्याचबरोबर त्यात काही मित्र देशांना सुट दिली आहे. त्यामुळे इतर देश अमेरिका आणि तिच्या मित्र देशाविरोधात तशीच कारवाई करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जागतिक व्यापार संघटनेच्या छत्राखाली सुरू असलेला जागतिक व्यापार कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गरीब आणि वेगाने विकसित होणाऱ्या देशावर जास्त परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.

मंदी कमी झाल्यानंतर जागतिक व्यापारासाठी पूरक वातावरण निर्माण झाले असतानाच आता व्यापारयुद्ध सुरू झाल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जगात निर्माण झालेले जशास तसे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे फिक्‍कीचे अध्यक्ष राशेष शाह यांनी सांगितले.
युद्धाच्या विरोधात असलेल्या देशांना एकत्र करण्याची गरज आहे. त्या कामी भारत पुढाकार घेऊ शकतो. नियमाच्या आधारावर चाललेला जागतिक व्यापार त्याच पद्धतीने चालू राहण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)