व्यापारयुद्धामुळे शेअर निर्देशांक कोसळले

विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे झाले 1.57 लाख कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई – अमेरिकेने सुरू केलेले व्यापारयुद्ध आता आणखी वाढविले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर 50 अब्ज डॉलरचा कर लावण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर लगेच चीननेही अमेरिकेच्या ज्या वस्तूवर कर लावला जाणार आहे, त्याची यादी जाहीर केली आहे. एकूण जागतिक आणि गुंतवणूकविषयक वातावरण चिघळणार आहे. त्यामुळे अमेरिकेसह जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअरबाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

आता बाजारांना दोन दिवस सुट्टी असल्यामुळे जागतिक वातावरण निवळण्यास मदत होणार आहे. काल अमेरिकेने व्याजदरात पाव टक्‍का वाढ केली आहे. या घडामोडीचा अंदाज गुंतवणूकदारांना होता, त्यामुळे अनेक आठवड्यापासून शेअरबाजारातील वातावरण मंद राहिले आहे. गेल्या चार आठवड्यांपासून भारतीय शेअरबाजार निर्देशांक कमी झाले आहेत.

सेन्सेक्‍स आता पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. तर निफ्टी या वर्षात प्रथमच 10 हजारांच्या खाली आहे. रिऍल्टी, धातू, बॅंकिंग, भांडवली वस्तू, आरोग्य, सरकारी कंपन्या, वाहन, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रांना आज झालेल्या मोठ्या विक्रीचा फटका बसल्याचे दिसून आहे. धातू कंपन्यांचे शेअर आज 6.58 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. आज निर्देशांकांत मोठी घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात एकाच दिवसात 1.57 लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे दिसून आले.

शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 409 अंकांनी म्हणजे 1.24 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 32596 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 116 अंकांनी म्हणजे 1.15 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 9998 अंकांवर बंद झाला. सलग चौथ्या आठवड्यात शेअरबाजार निर्देशांकात घट झाली आहे. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 579 अंकांनी कमी झाला आहे, तर निफ्टी 197 अंकानी कमी झाला आहे.
गेल्या अनेक आठवड्यापासून बॅंकांचे शेअर पिछाडीवर आहेत. युनियन बॅंकेचा एक घोटाळा उघडकीस आल्यामुळे आजही बॅंकांच्या शेअरच्या भावात घट झाली. मात्र काही आठवड्यांपासून रुपया घसरत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची आज खरेदी झाली. विक्रीच्या माऱ्याला फक्‍त एवढेच एक क्षेत्र अपवाद असल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)