व्यापारयुद्धामुळे भारताला स्वस्त तेलाचा लाभ

नवी दिल्ली : इराणवरील निर्बंध लागू होण्याअगोदर अमेरिकेकडून भारताच्या कच्च्या तेलाची खरेदी विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. जूनमध्ये अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात विक्रमी प्रमाणावर पोहोचले आहे आणि हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. आशियाई देशांनी तेलाच्या पुरवठय़ासाठी इराण आणि व्हेनेझुएलाच्या ऐवजी अमेरिकेस पसंती दिल्याने ट्रम्प प्रशासनाला विजय मिळाल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या कच्च्या तेलाचे दर तुलनेने कमी असल्याने भारताला लाभ होत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या सहकारी देशांना इराणकडून नोव्हेंबरपयंत कोणत्याही प्रकारची आयात पूर्णपणे रोखण्यास सांगितले आहे. अशा स्थितीत भारताकडून तेलाच्या खरेदीत वाढ होणे अमेरिकेसाठी कच्च्या तेलाद्वारे राजनैतिक हित साधण्याच्या प्रयत्नात यश मिळाल्याचे द्योतक आहे. नव्या आकडेवारीनुसार दरदिनी 1.76 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची निर्यात करून अमेरिका सर्वात मोठय़ा निर्यातदारांपैकी एक झाला आहे. हा आकडा एप्रिल महिन्यातील आहे हे विशेष.

आकडेवारीनुसार जुलैर्पक अमेरिकेचे उत्पादक आणि व्यापारी 15 दशलक्ष बॅरल कच्चे तेल भारताला पाठवतील, तर 2017 मध्ये हा आकडा केवळ 8 दशलक्ष बॅरल इतकाच होता. अमेरिकेकडून येणाऱया सामग्रीवर चीनने शुल्क वाढविल्यास भारत पुन्हा अमेरिकेकडून होणारी कच्च्या तेलाची आयात वाढवू शकतो. चीनच्या आयातशुल्कामुळे अमेरिकेला कच्च्या तेलाचे दर कमी करावे लागणार असल्याने भारताला याचा लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)