व्यापारयुद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम शक्‍य

नवी दिल्ली- कोणत्याही देशाने कितीही आयात शुल्क लावावे तसेच कोणत्याही देशांना त्यातून सुट द्यावी अशा प्रकारामुळे जागतिक व्यापारात अडचणी निर्माण होतील. त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असा इशारा पुन्हा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे. मंदीतून आता जागतिक अर्थव्यवस्था सावरू लागली असतानाच काही देश एकतर्फी निर्णय घेत असल्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

संघटनेचे महासंचालक रॉबोर्तो अझेवेदो यांनी सांगितले की, काही देशानी त्यांच्यात मतभेद असले तर ते चर्चेतून सोडवावेत किंवा जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून सोडवावेत. एकतर्फी निर्णय घेऊ नयेत असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, यामुळे जागतिक भांडवल बाजारावर गेल्या आठवड्यात परिणाम झाला आहे. त्याचा इतर बाजारांवरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेवरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 60 अब्ज डॉलरचे आयात शुल्क लावण्याची सूचना आपल्या वाणिज्य विभागाला केली आहे. त्यानंतर बदल्याच्या तयारीत असलेल्या चीनच्या व्यापार मंत्रालयाने अमेरिकेच्या ज्या वस्तूवर आयात शुल्क लावले जाणार आहे, त्याची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे जागतिक शेअरबाजार आणि इतर बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर देशही अमेरिकेच्या विरोधात लढण्याची तयारी करीत आहेत.

चीन अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. मात्र अमेरिकेतून आयात फारशी करीत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या 20 लाख नोकऱ्यावर परिणाम झाला आहे. त्या नोकऱ्या वाचविण्यासाठी आपण या धाडशी उपाययोजना करीत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
अमेरिकेने केवळ चीनच्या वस्तूवर आयात कर वाढविला तर चीन केवळ अमेरिकेच्या वस्तूवर आयात कर लावणार असल्याचे चीनने सांगितले आहे.

अमेरिकेने गेल्या पंधरवडयात अमेरिकेने येणाऱ्या पोलाद आणि ऍल्युमिनियमवर आयात शुल्क लावले होत. मात्र नंतर अमेरिकेने आल्या मित्र राष्ट्रांना यातून वगळले आहे. हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमात बसत नाही, असे चीनचे म्हणने आहे. चीन अमेरिका व्यापारात 370 अब्ज डॉलरची तूट आहे ती कमी करण्यासाठीं चीनला सांगितले होते. मात्र त्याकडे चीनने दुर्लक्ष केल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.

भारत जागतिक व्यापार संघटनेत जाणार
दरम्यान, आतापर्यंत या विषयावर तटस्थ भूमिका घेतली असली तरी आता भारत जागतिक व्यापार संघटनेत जाण्याची तयारी करीत असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा अमेरिकेने सर्वच देशासाठी आयात शुल्क लावले होते. त्यावेळी भारताने ही बाब गंभीरपणे घेतली नव्हती. मात्र, आता अमेरिकेने आपल्या अर्धा डझन मित्र देशांना यातून वगळले आहे. त्यामुळे भेदभाव केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अगोदर युरोपियन समुदायाबरोबर भारत जागतिक व्यापार संघटनेत जण्याची तयारी करीत होता. मात्र, आता अमेरिकेने युरोपियन समुदायाला या शुल्कातून वगळले आहे. त्यामुळे आता भारताला स्वत:च जाण्याची तयारी करावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)