व्यापारयुद्धात कुणाचेही भले नाही 

बर्लिन: व्यापारयुद्धाचा विस्तार होत असल्याने आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे आणि कोणत्याही देशाला त्याचा लाभ होणार नाही. चीन आणि अमेरिका यांच्या वादामुळे जागतिक व्यापाराला फटका बसणार आहे, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेचे महासचिव रॉबर्टो एजवेडो यांनी दिला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यादरम्यान तणाव वाढत आहे. भविष्यात होणारे परिणाम आता स्पष्ट दिसून येत आहेत. दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये तणाव वाढल्याने स्थायित्व, रोजगार आणि विकासावर गंभीर परिणाम होईल. व्यापारयुद्धाने आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होईल आणि जागतिक व्यापार वाढीमध्ये साधारण 70 टक्‍क्‍यांपर्यंत घट होईल. आंतरराष्ट्रीय विकासदरात घसरण होईल आणि युरोपियन महासंघाची जीडीपी वाढ 1.9 टक्‍क्‍यांपर्यंत घसरेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)