व्यापारयुद्धाच्या काळात भारत निर्यात वाढविणार

नवी दिल्ली: अमेरिका -चीन दरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा लाभ घेण्यासाठी भारताकडून पावले टाकण्यात येत आहेत. यानुसार चीनमधील बाजारपेठेत अमेरिकन वस्तूंची मोठ्या प्रमाणात असलेली मागणी पाहता त्या वस्तूंची यादी तयार करण्यात येत आहे. भारताकडून अशा 40 वस्तूंची यादी अद्यापपर्यंत तयार करण्यात आली आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धामुळे अमेरिकेतील वस्तूंची चीनमध्ये निर्यात करणे महाग झाले आहे. अशा वस्तूंची यादी आता चीनकडून तयार करण्यात येत आहे. या यादीमध्ये ताजी द्राक्षे, कापड, तंबाखू, स्टील बॉयलर अशा वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. चीनमध्ये अशा वस्तूंची निर्यात करण्यात आल्याने दोन्ही देशांना व्यापारासाठी लाभ होईल. सध्या चीनबरोबरची भारताची व्यापार तूट 63 अब्ज डॉलर्सची आहे, ती घटविण्यास मदत होईल.

मास, बदाम अशा 20 वस्तूंची चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात करणे शक्‍य आहे. सध्या या वस्तूंची निर्यात करण्यास भारताला आवश्‍यक त्या प्रमाणात संधी मिळाली नव्हती. एका अहवालानुसार भारतातून 80 वस्तूंची चीनमध्ये निर्यात करता येते. चीन मोठ्या प्रमाणात निर्यात करता येईल अशा वस्तूंची यादी करण्यासाठी भारत सरकारकडून विभाग आणि उद्योग संघटनांना सांगण्यात आले आहे. व्यापारयुद्धामुळे नवीन पुरवठा साखळी निर्माण होत आहे. भारतातील उत्पादन वाढण्यास मदत होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)