व्यापक विचार हेच यशाचे गमक!

पिंपरी- थिंक ग्लोबली ऍण्ड ऍक्‍ट लोकली, अर्थात जागतिक स्तरावर विचार करून स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हेच यशाचे गमक आहे, असे मत बोस्निया व हर्जेगोविना देशाचे भारतातील राजदूत सुहास मंत्री यांनी व्यक्त केले.

नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनची भागीदार असलेल्या यशस्वी संस्थेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसच्या संचालिका प्रा. भाग्यश्री कुंटे, यशस्वी ऍकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक अजय रांजणे, संजय छत्रे, स्मिता धुमाळ, मल्हार करवंदे, संस्थेचे ऑपरेशन हेड मकरंद कुलकर्णी, संस्थेच्या संचालिका शोभा कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुपरवायजर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, एकांकिका असे विविध सांस्कृतिक कलाप्रकार सादर केले.

मंत्री म्हणाले की, विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात करिअरकडे लक्ष देत असतानाच परिस्थितीची जबाबदारी घ्यायला शिका, हे माझे काम नाही, मी का हे काम करू असा संकुचित दृष्टिकोन कधीही ठेवू नका. तसेच, आपण ठरवलेल्या ध्येयाचा व्यापक पातळीवर विस्तार करायला सुरुवात करा. असे केल्याने तुमच्यातील सुप्त क्षमता विकसित होऊन, त्यामुळे आपला प्रगतीचा आलेख आणखी उंचावतो. युवकांनी थ्री टी ( टी- थिंक ग्लोबली ऍक्‍ट लोकली, टी- टेक रिस्पॉन्सिबिलीटी, टी- थिंक फॉर लार्जर सर्कल) अर्थात जागतिक पातळीवर विचार करून स्थानिक पातळीवर कृती करणे, जबाबदारी घेणे व व्यापक स्तरावर विचार करणे, या तीन गुणांचा अंगीकार केल्यास आपल्याला शाश्‍वत यश नक्की प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी संस्था समुहाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले. तर, आभार प्रदर्शन यशस्वी ऍकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे यांनी केले.

कौशल्य अद्ययावत ठेवण्यासाठी शिका
डेक्कन मॅनेजमेन्ट कन्सल्टन्टचे संचालक ऍड. श्रीनिवास ईनामती म्हणाले की, केवळ आपले शिक्षण झाल्यानंतर शिकणे थांबवू नका. सातत्याने आपल्यातील कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी शिकण्याची मानसिकता आयुष्यभर जपा. तसेच, यशस्वी संस्थेने आता जागतिक स्तरावर आपला कार्यविस्तार करण्यासाठी देशाबाहेरही कौशल्य विकास क्षेत्रात काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुणे महापालिकेच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या की, कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नव्या पिढीमुळे नक्कीच देशाचे भविष्य दैदिप्यमान होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)