व्याजवाडी सरपंच, उपसरपंच सदस्यत्वाच्या अपात्रता प्रक्रियेला स्थगिती

File photo

वाई – व्याजवाडी सरपंच व उपसरपंचाचे सदस्यत्व अपात्र ठरविल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशास विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. घरपट्टी थकबाकीच्या कारणावरून सदस्यत्व अपात्र ठरविल्याबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशास आव्हान देणारे अपिल व्याजवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्‍मा पिसाळ व उपसरपंच प्रियांका मिसाळ यांनी पुणे विभागीय आयुक्ताकडे दाखल केले. त्यावर अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयास तात्पुरती स्थगिती दिली आहे.

ग्रामपंचायत सदस्य दीपक पिसाळ यांनी 2 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंदर्भातील तक्रार दाखल केली होती. ग्रामपंचायत सदस्य रेश्‍मा शरद पिसाळ यांनी 945 रुपये व प्रियांका संजय मिसाळ यांनी 1083 रुपये घरपट्टी व इतर करांची रक्कम रुपये नियमानुसार विहीत वेळेत भरणा न केल्याने त्या थकीत झाल्या असून त्यामुळे त्या सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दीपक पिसाळ यांचा विवाद अर्ज मान्य करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 खंड (ह) व कलम 16 अन्वये रेश्‍मा पिसाळ व प्रियांका मिसाळ यांना उर्वरित कालावधीसाठी सदस्यपदावरून अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश 10 ऑगस्ट 2018 रोजी दिला.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशास रेश्‍मा पिसाळ व प्रियांका मिसाळ यांनी पुणे विभागीय आयक्ताकडे आव्हान देणारे अपिल दाखल केले. त्यावर अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी अपिलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशास स्थगिती दिली असल्याची माहिती सरपंच रेश्‍मा पिसाळ यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)