व्याजदर वाढीमुळे शेअर बाजारात नफेखारी 

जागतिक बाजारातूनही नकारात्मक संदेश आल्याने निर्देशांकात घट 
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने महागाईला रोखण्यासाठी प्राधान्यक्रम देऊन व्याजदरात काल पाव टक्‍क्‍यानी वाढ केल्यामुळे व्याजदराशी संबंधीत कंपन्याच्या शेअरची गुरुवारीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचबरोबर जागतीक बजाराचूनही आज नकारात्मक संदेश आले.अमेरीकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर जैसे थे ठेवले असले तरी आगामी काळता कडक पतधोणाचे संकेत दिले आहेत. अमेरीका आणि चीनदरम्यानचे व्यापार युध्द चिघळत चालले आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी आज मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे वातावरण होते. आज दिवसभर निर्देशाक कमी होत गेले.
गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 356 अंकानी म्हणजे 0.95 टक्‍क्‍यानी कमी होऊन 37165 अंकावर बंद झाला. कालही पतधारणानंतर सेन्सेक्‍स 84 अंकानी कमी झाला होता. त्याच बरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 101 अंकानी म्हणजे 0.89 टक्‍क्‍यानी कमी होऊन 11244 अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप मात्र 0.07 टक्‍क्‍यानी अंकानी तर मिड कॅप 0.09 टक्‍क्‍यानी वाढला.
काल पतधोरण जाहीर झाल्यानंतर किरकोळ गुंतवणूकदाराबरोबरच संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री केली. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 95 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 562 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली आहे. गेल्या काही दिवसात निर्देशांक मोठया प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे कुंपणावरील गंतवणूकदारांनी आज नफेखोरी केली. आगामी काळताही हे गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता आहे.
रुपयाचे मुल्य आज सकाळी मोठठ्या प्रमाणात घसरल्यानंतर गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोर वाढल्याचे दिसून आले, असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. आज झालेल्या मोठ्या नफेखोरीचा फटका दूरसंचार, रिऍल्टी, बॅंकिंग, तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, भांडवली वस्तू,नैसर्गिक वायू आणि ग्राहक वस्तू क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला. या क्षेत्राचे निर्देशांक 1.47 टक्‍क्‍यांपर्यंत घटले. मात्र या पडझडीतही आरोग्य, पायाभूत सुविधा क्षेत्राचे निर्देशांक वाढल्याचे दिसून आले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)