व्याघ्रप्रकल्पातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत

जनावरांचे भय आणि नुकसानीची त्रास

ठोसेघर – सातारा, जावळी, पाटण या तालुक्‍यांतील अति दुर्गम व जंगलाचा काही भाग हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कोयना अभयारण्यात मोडतो. या भागातील व आसपासच्या ठोसेघर, कास, बामणोली, सांडवली, परिसरातील दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये अस्वल, बिबट्या, रान गवे, रान डुक्करे यांच्या उपद्रव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. वारंवार ग्रामस्थांनवर होणारे हल्ले व गावाच्या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त वावर यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर हे तालुके निसर्ग संपदेने नटलेले आहेत. ठोसेघर धबधबा, कास पुष्प पठार, वजराई धबधबा यांसारखी पर्यटन स्थळे याच भागात आहेत. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा काही परिसरही याच भागात येतो. त्यामुळे दुर्गम आणि घनदाट जंगलांनी व्यापलेल्या या भागात हिंस्त्र प्राण्यांचा वावर कायमच असतो.

एकीकडे वन्य प्राण्यांचे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वनविभाग व शासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. परंतु, त्याच वेळी स्थानिक नागरिकांवर वन्य प्राण्यांचे होणारे हल्ले, गावाच्या परिसरातील हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त वावर, प्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान यामुळे ग्रामस्थांना जगणे मुश्‍कील झाले आहे. याबाबत वन विभागाकडून कठोर पावले उचलत आवश्‍यक उपाययोजना करण्याची मागणी येथील ग्रामस्थांपकडून उपस्थित होत आहे.

काही दिवसांपासून हल्ल्यांमध्ये वाढ
काही दिवसांपूर्वीच भगवान माने (पिसाडी), दगडू सूर्वे (आलवडी) यांच्यावर अस्वलांनी प्राण घातक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे. कारगावात बिबट्याने सरळ घरात घुसून वासरावर हल्ला केला होता. तर काही महिन्यांपूर्वीच कोंडाबाई कोकरे (वेळे ढेण) यांच्यावर राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावरच रानटी गव्याने प्राण घातक हल्ला करून जखमी केले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजच्या दैनंदिन कामांसाठी घरातून बाहेर पडनेही धोकादायक झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)