व्याख्यानमालेमुळे ज्ञानात भर -सरपंच गांजाळे

मंचर’- स्व. किसनराव बाणखेले उर्फ अण्णांनी 34 वर्षांपूर्वी मंचर येथे व्याख्यानमाला सुरू करून लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर होत असून अशा व्याख्यानमालेमुळे नागरिकांच्या ज्ञानामध्ये भर पडते आहे, असे मत सरपंच दत्ता गांजाळे यांनी व्यक्‍त केले.
मंचर येथील शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव लोकनेते किसनराव बाणखेले व्याख्यानमालेचा 33 व्या ज्ञान सत्राचे उद्‌घाटन सरपंच दत्ता गांजाळे यांच्या उपस्थितीत व लाला बॅंकेचे अध्यक्ष प्रल्हाद नानाभाऊ बाणखेले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी भैरवनाथ यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ता थोरात, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील बाणखेले, शिवस्मारक समितीचे कार्याध्यक्ष कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, यात्रा उत्सव समितीचे कार्याध्यक्ष वसंत बाणखेले, जे. के. थोरात, बाजीराव मोरडे, भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष प्रवीण मोरडे, सुरेश निघोट, शेवाळवाडीच्या सरपंच सुमन थोरात, मंचर ग्रामपंचायत सदस्या अश्‍विनी शेटे उपस्थित होते. यावेळी शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग महाराज येवले यांनी मनोगत व्यक्‍त झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश घिसे यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण इंजिनियर उदयपाल वाढई वणीकर यांनी आपल्या कलेतून सप्तखंजरी वाजवत समाजाचे चांगल्याप्रकारे प्रबोधन करून उपस्थितांची मने जिंकली. तुकाराम महाराज तुकडोजी महाराजांचे विचार पोहोचविण्याचे काम इंजिनियर उदयपाल वाढई वणीकर समाजात करतात, असे कामगार नेते ऍड. बाळासाहेब बाणखेले यांनी त्यांची ओळख करून देताना सांगितले. तर गणेश कडलक यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)