व्यसनमुक्‍तीसाठी चित्रकला हे सर्वोत्तम माध्यम

लोणी काळभोर- आजचे विद्यार्थी व महाविद्यालयीन तरूण व्यसनांच्या आहारी जात असून ही गंभीर बाब आहे. त्यांना या व्यसनांपासून दूर करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी चित्रकला हे माध्यम सर्वोत्तम आहे, असे मत पुण्यातील न्यायालयाचे वरिष्ठ न्यायदंडाधिकारी ओमप्रकाश शिवराज पाटील यांनी व्यक्‍त केले. बालदिनाचे औचित्य साधून येथील विश्‍वराज हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्‍वराज महारंगोत्सव चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ न्यायदंडाधिकारी ओमप्रकाश पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. आर्या, डॉ. चंद्रकांत सहारे, डॉ. राजेश दाते, डॉ. मतीन सय्यद, डॉ. वैभव थोरात, जेष्ठ कवी व चित्रकार सूर्यकांत नामुगडे, परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, कलाशिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. पाटील यांनी विद्यार्थी व तरुणांमधील व्यसनाधिनतेवर आपल्या न्यायालयातील विविध गमतीदार प्रसंगातून टीकात्मक मते व्यक्त केली. यावेळी विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड यांनी मार्गदर्शन केले. रंगभरण स्पर्धेत 35 शाळांतील 1 हजार 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा मुले, मुली आदी वेगवेगळ्या गटांमध्ये झाली. समारंभाची प्रस्तावना विश्वराज हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. जानकी राम यांनी केले. समारंभाच्या अध्यक्ष विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड या होत्या.
स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश दाते यांनी केले. चित्र परीक्षणाचे काम कलाशिक्षक आबा सायकर व पराग होलमुखे यांनी केले. स्पर्धा नियोजनाचे काम धनंजय मदने यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)