व्यसनमुक्‍तीसाठी कुटुंबवत्सल भावना गरजेची

डॉ. अनिल अवचट: “समाजातील व्यसनाधीनता’ विशेषांकाचे प्रकाशन
पुणे, दि.29 – दारूचे व्यसन गरीब, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय सर्वांमध्येच आहे. व्यसनमुक्तीसाठी आपल्याकडे कुटुंबातील व्यक्ती सोबत असतात. त्यामुळे रुग्ण व्यसनातून लवकर बारा होण्यास मदत होते. भारतीय संस्कृतीमधील कुटुंबवत्सल भावना व्यसनी माणसाला बरा करण्यात उपयुक्त ठरते. या अवस्थेत कुटुंबाकडून प्रेम, वात्सल्य, आत्मीयता मिळाली, तर आपण व्यसनांना दूर ठेऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि मुक्‍तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी केले.
पालकत्वाला वाहिलेल्या आणि समाजाला समर्पित तुम्ही-आम्ही पालक संस्थेतर्फे “समाजातील व्यसनाधीनता’ या विशेषांकाचे प्रकाशन मुक्‍तांगण व्यसनमुक्ती केंद्रात डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या उपसंचालिका मुक्ता पुणतांबेकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर, ‘तुम्ही-आम्ही पालक’चे संस्थापक संपादक हरीश बुटले, “युक्रांद’चे अध्यक्ष संदीप बर्वे आदी उपस्थित होते.
डॉ. अनिल अवचट म्हणाले, मुक्तांगणमध्ये येऊन लोकांच्या वागण्यात सुधारणा होते. आज येथील अनेक कर्मचारी पूर्वी रुग्ण होते. परंतु, त्यांचा आणि कुटुंबाचा सहभाग लाभल्याने त्यांच्यात परिवर्तन शक्‍य झाले. समर्पित भावनेने एखादी गोष्ट केल्यास ती लवकर स्वीकारली जाते. मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, “व्यसनाधीनता हा सामाजिक प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अल्पवयीन मुले, महिला दारू आणि ड्रग्ससारख्या गंभीर व्यसनांना बळी पडत आहेत. सोशल मिडीया व्यसनाच्या वर्गात येऊ लागले आहे. अशावेळी समाजात जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)