व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या 12 संस्थांना अनुदान

मुंबई – सामाजिक न्याय विभागामार्फत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व पुनर्वसन केंद्र योजनेंतर्गत, महसूल विभागातून प्रत्येकी 2 संस्थांना म्हणजेच राज्यातील 12 नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना त्यांचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रत्येकी 11 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी पात्र संस्थांनी त्यांचे प्रस्ताव 25 मे रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करावे लागणार आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई शहर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)