व्यसनमुक्तीसह प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा

पाथर्डीतील मोहोज गावातील महिला बचतगटांचा मोर्चा

नगर – पाथर्डी तालुक्‍यातील मोहोज गावात चला गाव स्वच्छ करू या नावाने एक नवीन आगळेवेगळे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गावात व्यसनमुक्ती, गुटखाबंदी यांसह सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. व्यसनमुक्तीसाठी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवेदन दिले.

पोलीस प्रशासनाने व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेण्याचे जाहीर आश्‍वासन दिले. त्यानंतर वेळोवेळी कळवून देखील पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळाले नाही. गावात अवैध दारू विक्री सुरूच आहे. व्यसनमुक्तीला बळ न देणाऱ्या या सर्वबांबीकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय दलित महासंघ व महिला बचतगटतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

मोहोज बुद्रुक या गावातील व्यसनमुक्ती करावी, शासकीय योजनांचा लाभ देताना गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्राधान्य द्यावे. वंचित, वृद्ध, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देताना कागदपत्रांतून सूट द्यावी, ज्येष्ठांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळावा, कागदपत्रांअभावी वंचित राहिलेल्या मागासवर्गीय महिलांना शासन आपल्या दारी या माध्यमातून गावाताच जातीचे दाखले द्यावेत, अंगणवाडीच्या जीर्ण इमारतीचे निर्लेखन करून इमारत उभारावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. जय लहुजी, संत रोहिदास, लहुजी, रमाबाई, एकलव्य गट आदीं आंदोलनात सहभागी झाले होते. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील उमाप, सविता शिरसाठ, कामिनी शिरसाठ, सरला जाधव, वंदना जाधव, अश्‍विनी गायकवाड, मंगल थोरात, सुरेश शिरसाठ, अनिल उमाप आदी यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)