नगर – नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था तसेच श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सोमवार दि.14 मे रोजी छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित्त निमगाव वाघा येथे व्यसनमुक्तीवर राज्यस्तरीय खुली पोस्टर स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी दिली. युवकांना व्यसनापासून लांब राहण्याचे आवाहन करण्याकरीता व त्याचे दुष्परिणाम सांगण्यासाठी व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्तीवर आकर्षक घोषवाक्यांसह, हातानी बनवलेले पोस्टर डोंगरे संस्थेच्या निमगाव वाघा येथील कार्यालयात दि. 10 मे पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा