व्यवहार ज्ञान, व्यक्‍तिमत्व विकासाचे धडे देणारी श्री गणेश शिक्षण संस्था

विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन येथे शिकणाऱ्या मुलांना दिले जाते. दैनंदिन व्यवहारज्ञान, कला, व्यक्तिमत्व विकासाचे धडे येथे दिले जातात. म्हणूनच श्रीगणेश शिक्षण संस्थेचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त करीत आहेत.

पारंपरिक शिक्षण पध्दतीपेक्षा शिक्षणातील नावीन्य शोधून मुलांच्या शिक्षणातील खडतर वाटा सोप्या केल्याने श्रीगणेश शिक्षण संस्थेत शिकणारा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात विजयी होत आहे. प्रत्येक वर्षी तब्बल 200पेक्षा ज्यास्त विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी प्रवेशासाठी निवड होते. शेकडो विद्यार्थी दरवर्षी 80 टक्केपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होतात. अनेक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरतात.
प्रा. विजय शेटे यांच्या कल्पक बुध्दीतून मार्केटमधील नवीन प्रकाशनावर अभ्यास करून स्वत:चे वेगळे प्रकाशन तयार करण्याचे काम प्रा. शेटे करीत असतात. मुलांना सहज व सुलभ सोप्या भाषेत गरजेचे शिक्षण देऊन प्रत्येक क्षेत्रात आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी विजय व्हावा ही आशा प्रा. विजय शेटे यांची आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असतात. महागड्या शहरात त्यांना जाणे व शिक्षण घेणे शक्‍य होत नाही. त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रा. विजय शेटे व त्यांचा संपूर्ण परिवार श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणरूपी सेवा करीत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाचा विजयस्तंभ उभा करण्याचे काम प्रा. विजय शेटे करीत आहेत. बदलत्या शिक्षण पध्दतीचा सामना करण्यासाठी, विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी श्रीगणेश शिक्षण संस्था तत्पर असल्याचे त्यांच्या कृतीतून व निकालातून दिसून येते. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे होणारे बदल अनेक शैक्षणिक संस्थांना कठीण जात आहेत. अभ्यासातील होणारे बदल, मुलांच्या मनातील ताणतणाव, पालकांच्या जीवाची घालमेल, शिक्षण, प्रत्येक क्षेत्रातील होणारे आमूलाग्र बदल आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे सर्वांची चिंता वाढत चालली आहे. स्पर्धात्मक शिक्षण घेण्यासाठी योग्य शिक्षण संस्थेच्या शोधात पालक व विद्यार्थी असतात. योग्य वेळेत लाभदायी शिक्षण देऊन खात्रीशीर निकालाची परंपरा राखणाऱ्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू असते. सर्व पालकांच्या विश्‍वासाला व मुलांच्या निकालाची यशोगाथा कायम असणारी शिक्षण संस्था म्हणजे श्रीगणेश शिक्षण संस्था. हमखास यश आणि श्रीगणेश हे समीकरण सध्या अनेकांच्या मनात सिध्द करण्याचे काम या संस्थेने केले आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलाचा आत्मविश्‍वास वाढण्याचे काम श्रीगणेश शिक्षण संस्था करीत आहे. प्रा.विजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी डॉक्‍टर, इंजिनिअर यासह विविध क्षेत्रातील नामवंत अधिकारी घडविले आहेत व घडविण्याचे कार्य सुरू आहे.

श्रीगणेश कोचिंग क्‍लासेसच्या रूपाने ही किमया अनेक वर्षापासून साध्य केली आहे. कमी वेळेत योग्य पध्दतीने अभ्यास करून घेण्यासाठी या संस्थेतील तज्ञ शिक्षक प्रयत्न करीत असतात. म्हणूनच येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी यशस्वी होत आहेत. अनेक पालकांच्या इच्छेपोटी प्रा. विजय शेटे यांनी कोचिंग क्‍लासबरोबर स्वत:चे ज्युनियर महविद्यालय स्थापन करून एकाच ठिकाणी कोचिंग क्‍लास व विद्यालय सुरू करून इच्छुक पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा दिला. पहिल्याच वर्षी श्रीगणेश ज्युनियर महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर प्रवेशासाठी पात्र ठरले. बदलत्या शिक्षण पध्दतीला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना लहानपणापासून योग्य प्रकारचे शिक्षण दिले तरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला प्रत्येक क्षेत्रात विजय मिळविता येतो हे प्रा. विजय शेटे यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या शिक्षकांकडून या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एल.के.जी., यु.के.जी.पासून ते 1लीते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. त्यांच्याकडून तशी तयारी करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांत रूजवली जाते. हसत, खेळत, सहज शिकण्याची आवड तयार केली जाते. मैदानी खेळातून कोवळ्या शरीरात बळकटी आणून विविध खेळांचे प्रशिक्षण तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून येथे दिले जाते. खेळाबरोबर योगा, प्राणायम करून घेतल्याने विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीमध्ये वाढ करण्याचे काम ही संस्था करीत आहे. मुलांमध्ये अभ्यासाची रूची वाढावी याकरिता मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. मुलांच्या शिक्षणातील आवडीमुळे शाळेतील प्रत्येक दिवस त्यांच्या आवडीचा ठरतोय. उच्चशिक्षित शिक्षकांमुळे येथे दररोज अभ्यासातील परीपूर्ण तयारी करून घेतली जाते. विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन येथे शिकणाऱ्या मुलांना दिले जाते. दैनंदिन व्यवहारज्ञान, कला, व्यक्तिमत्व विकासाचे धडे येथे दिले जातात. म्हणूनच श्रीगणेशचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात विजयस्तंभ होत आहे.श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शिक्षकाच्या मेहनतीचे फलीत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा व पालकांचा यशदायी आनंद असतो. म्हणूनच या संस्थेत पालक, शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्थापन यांचे दृढ नाते निर्माण झालेले आहे. प्रा. विजय शेटे यांच्या अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाच्या बळावर व शिक्षणातील यशावर संस्थेचा विजयस्तंभ मजबूत आहे.

प्रा. विजय शेटे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)