मागील काही वर्षांपासून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करण्याकडे विद्यार्थांचा कल वाढल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर तांत्रिक कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थादेखील या कोर्सकडे वळत आहेत. असे होण्याचे कारण म्हणजे आज सगळ्याच छोट्या-मोठ्या कंपन्यांना त्यांचा व्यावसाय संभाळण्यासाठी मॅनेजमेंट प्रशिक्षितांची आवश्यकता भासू लागली आहे.
पदवीनंतरचे कोर्स –
एमबीए (फुलटाइम) – एमबीए म्हणजे मॅनेजमेंट ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन होय. या कोर्समध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवसाय कसा चालवावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले जाते. ज्यामध्ये विद्यार्थांना मॅनेजमेंटच्या सर्व विषयांध्ये निपूण बनवण्याबरोबरच एका विषयात एक्सपर्ट बनवले जाते. एमबीए रेग्युलर कोर्समध्ये प्रवेशासाठी आर्टस्, कॉमर्स अथवा विज्ञान विषयांमध्ये कमीत-कमी 60 टक्के गुण घेऊऩ ग्रॅज्युएट उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. याच्यासोबत मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी कॅट, मॅट, सीमॅट, स्नॅप किंवा जिमॅट यासारख्या प्रवेश परीक्षा पास करणेदेखील आवश्यक असते. कारण आयआयएमसह चांगल्या संस्थांमध्ये याच परीक्षांमधील गुण बघून प्रवेश देण्यात येतो.
एमबीए (एक्झिक्युटिव्ह) – एमबीए (एक्झिक्युटिव) याला कार्यकारी एमबीए या नावानेदेखील ओळखले जाते. हा डिग्री कोर्स आहे. मुख्यतः अधिकारी, मॅनेजर, उद्योजक आणि अन्य व्यापार जगताशी संबंधित व्यक्तींना व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी हा कोर्स तयार करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उमेदवार कमीतकमी पदवीधारक आणि कामाचा अनुभव असणे गरजेचा आहे. हा कोर्स एक ते दोन वर्ष कालावधीसाठीचा आहे.
पीजीडीबीएम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिजनेस मॅनेजमेंट) – हा पीजी डिप्लोमा कोर्स असून एआयसीटीईद्वारा मान्यताप्राप्त पीजीडिबीएम किंवा पीजीडीएम फुलटाइम कोर्स देखील एमबीए डिग्रीच्या समकक्ष मानला जातो. इग्नूसह देशातील विभिन्न संस्थांमध्ये हा कोर्स रेग्युलर आणि दुरस्थ माध्यमातून करता येऊ शकतो. कोणत्याही विषयातील 60 टक्के गुण मिळवून पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार यासाठी प्रवेश घेऊ शकतो.
निखिल म्हात्रे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा