मागील काही वर्षांपासून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करण्याकडे विद्यार्थांचा कल वाढल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर तांत्रिक कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थादेखील या कोर्सकडे वळत आहेत. असे होण्याचे कारण म्हणजे आज सगळ्याच छोट्या-मोठ्या कंपन्यांना त्यांचा व्यावसाय संभाळण्यासाठी मॅनेजमेंट प्रशिक्षितांची आवश्यकता भासू लागली आहे.
12वीनंतर करण्यात येणारे कोर्स
बीबीए – बीबीए म्हणजे बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मॅनेजमेंट सिद्धांतांबद्दल एक्सपर्ट बनविण्याचे काम करतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्केटिंग अकाउंटिंग, फायनान्स आणि इंटरनॅशनल बिजनेससह विविध क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते. देशातील अनेक संस्थांमध्ये सध्यादेखील हा कार्स चालविण्यात येत असून येथे प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश घेता येऊ शकतो. काही संस्था 12 वीमध्ये 50 ते 60 टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.
बीबीएस – बॅचलर ऑफ बिजनेस स्टडिज हा देखील अंडर ग्र्रॅज्युएट कोर्स असून याचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही कॉर्पोरेट सेक्टर कंपनीमध्ये मॅनेजर पदाच्या समकक्ष नोकरी मिळू शकते. इंग्रजी विषयात 60 टक्के गुण अथवा कोणत्याही स्ट्रीममधील 12 उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो.देशातील अनेक विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहेत.
बीएमएस- बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज बीबीएप्रमाणे हा देखील एक अंडर ग्रॅज्युएट मॅनेजमेंट कोर्स असून हा तीन वर्षांचा आहे. यामध्ये 12 उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
बीबीई – बॅचलर ऑफ बिजनेस इकोनॉमिक्स कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा 60 टक्क्यांनी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतो. विविध महाविद्यालयांमध्ये हा कोर्स उपलब्ध असून प्रवेश परीक्षेच्या आधारावर येथे विद्यार्थांना प्रवेश दिला जातो.
बीएफआयए – बॅचलर ऑफ फायनेंशियल इन्व्हेस्टमेंट अँड ऍनालिसिस) 12 नंतर विद्यार्थी हा पदवीस्तरीय प्रोफेशनल कोर्स करू शकतो. बीएमएस, बीबीईप्रमाणेच बीएफआयएमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधाराव प्रवेश घेता येऊ शकतो. देशातील सर्व महाविद्यालयात हा कोर्स उपलब्ध आहे.
निखिल म्हात्रे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा