व्यवसायिक दृष्टीने शिक्षण घेतल्यास करिअरची संधी

रांजणगाव गणपती – विद्यार्थ्यांनी भविष्य काळातील व्यवसाय आणि नोकरींच्या संधीचा विचार करता त्या पद्धतीने शिक्षण घेतल्यास आपले करिअर उत्तमरित्या घडवू शकेल, असे प्रतिपादन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी वाघाळे (ता.शिरुर) येथे केले. शिक्रापूर रोटरी क्‍लबच्या वतीने वाघाळे येथील कालिकामाता माध्यमिक विद्यालयाला ई-लर्निग संच देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिक्रापूर रोटरी क्‍लबचे संस्थापक-अध्यक्ष वीरधवल करंजे, संजीव मांढरे, प्रा.संजय देशमुख, सरपंच बबनराव शेळके, माजी सरपंच तुकाराम भोसले, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वाल्मिक गावडे, गजानन थोरात, पिंपरी दुमाला गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संदीप सोनवणे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष किरण शेळके, डॉ.श्रीकांत सोनवणे, दत्ताञय सोनवणे, नवनाथ चातुर, विजय शेळके, निलेश डफळ, गणेश थोरात विद्यालयाचे उपशिक्षक संजय मचाले, बाळासाहेब शेळके, मारुती सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कालिकामाता विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने यासाठी प्रयत्न केले होते. तर विद्यार्थ्यांनी आपल्या संस्काराला तडा जाऊ देऊ नका, असे आवाहन रोटरी क्‍लबचे अध्यक्ष डॉ.मच्छिंद्रनाथ गायकवाड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी प्रास्तविक पञकार संभाजी गोरडे यांनी केले. तर स्वागत सतीश पाटील यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)