व्यवसायासाठी घरगुती सिलिंडर वापरणाऱ्या तिघांवर कारवाई

वाघोली- हवेली तालुक्‍यातील वाघोली येथे स्नॅक्‍स सेंटरच्या हातगाडीवर व्यवसायिक सिलिंडरऐवजी घरगुती सिलिंडर वापरणाऱ्या तिघांवर लोणीकंद पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्यावर 285 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली धोकादायकरित्या घरगुती सिलिंडर लावणाऱ्यांवर कारवाई करणार आहे, असे पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब टापरे यांनी सांगितले. वाघोलीतील बाईफ रोड, शिवाजी पुतळा चौक, केसनंद फाटा चौक येथे पोलिसांनी कारवाई केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)