व्यवसायाभिमुख मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे : नितीन गडकरी

File photo

नितीन गडकरी : विदर्भातील 50 हजार युवकांना रोजगार देण्याचे लक्ष्य

नागपूर – विदर्भात खनीज व वनसंपत्तीवर आधारित उद्योगांची स्थापना झाल्यास त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे आहे. अशा मनुष्यबळासाठी व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था विदर्भात आता उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर येथे आयोजित “युथ एम्पॉवरमेंट समिट’च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

नागपूरात एम्स, आयआयएम, आयआयआयटी, तसेच इतर प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या असून त्यांच्या मार्फत व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण येथील युवकांना मिळणार आहे. उद्योगासाठी पाणी, वीज तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने मिहानसारख्या प्रकल्पात मोठे मोठे उद्योग गुंतवणूक करत आहेत. मेट्रो प्रकल्प, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध असून विदर्भातील 50 हजार युवकांना रोजगार प्राप्त करून देण्याचे आपले लक्ष्य आहे, असे गडकरी यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युथ एम्पॉवरमेंट सामिटच्या माध्यमातून युवा सशक्‍तीकरणाला चालना मिळाली आहे, अशी भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्‍त केली. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे प्रकाशित अहवालानुसार देशात 80 लाख तरूणांनी भविष्य निर्वाह निधी खाते उघडले असून त्यातील सुमारे 25 टक्के खाती ही महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
या परिषदेच्या स्थळी सरकारी व खासगी योजनांचे महामंडळ, बॅंक व नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीचे स्टॉल्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व प्रेरणादायी मान्यवरांचे मार्गदर्शन व परिसंवादही आयोजित करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)