व्यवसायाच्या वादातून सत्तुरचे वार

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी)
दुकानात येत असलेल्या ग्राहकांना बोलवत असल्याचे समजुन एकावर सत्तुरने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
विकास नेताजी काळे रा. तासगाव ता. सातारा हा बसस्थानकासमोर उभा होता. त्यावेळी शंकर बबन पाटोळे व बबन चंद्रु पाटोळे हे दोघे आले. त्यांनी तु आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना का बोलावतो असे म्हणत मारहाण केली. त्यावेळी शंकर याने त्याच्याकडील सत्तुरने विकासच्या डोक्‍यात व डाव्या हातावर वार केले. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आलेली विकासची पत्नी रेश्‍मा हिला हाताने मारहाण केली. याप्रकरणी विकास काळे याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पो. हवा. तोरडमल हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)