व्यवसायवृद्धीसाठी बदलांचा स्वीकार आवश्‍यक

अशोक सोनवणे ः जर्मनीत आयोजित औद्योगिक प्रदर्शनासाठी आमीचे पदाधिकारी रवाना
नगर – उद्योजकांनी चौकटीबद्ध व्यवसाय न करता चौकटी बाहेर पडून स्वतःची कार्य कुशलता सिद्ध केली, तर विश्‍वभरारी करीत जगात स्वतःच्या देशाचे पर्यायाने स्वतःचा नावलौकिक मिळवतील. व्यवसाय व व्यवस्थापनमध्ये उद्योजक हा नेहमीच एक पाऊल पुढे असावा. आपला उद्योग व्यवसाय वृद्धींगत करीत असताना जगाच्या पाठीवर आपण कोठे आहोत. आपल्या व्यवसायात कोणते बदल आवश्‍यक आहोत. हे काळाच्या ओघात त्याला समजायला हवे, तरच आपल्या देशाचे नाव जगाच्या पाठीवर कोरले जाईल, असा विश्‍वास आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी व्यक्त केला.
जर्मनीत आयोजित मॅसे हॅनओव्हर 2018 या औद्योगिक एक्‍झिबिशनसाठी जाणार्या आमी संघटनेच्या पदाधिकार्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी असो.चे अध्यक्ष अशोक सोनवणे बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष दौलतराव शिंदे, सेक्रेटरी दिलीप अकोलकर, जनरल सेक्रेटरी मिलिंद कुलकर्णी, सहसेक्रेटरी राजेंद्र कटारिया, दौराप्रमुख महेश इंदाणी, मोहन लुल्ला, सुभाष झिने, प्रफुल्ल पारेख, नरेंद्र बाफना, एम. डी. कुलकर्णी, सतीश गवळी, श्रीप्रसाद पतके, अभय बरमेचा, अशोक पानसरे, संदीप साळी, संदीप कोद्रे आदी उपस्थित होते. सलग 5व्या वर्षी आमी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य विदेश दौऱ्यावर जात आहेत.
सोनवणे म्हणाले की, प्रत्येक वर्षी आमी संघटना उद्योजकांना विश्‍वातील नवीन संकल्पना अवगत व्हाव्यात, उद्योजकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी व उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मदत होईल, यासाठी विदेश दौरे आमीच्या वतीने आयोजिले जातात. आतापर्यंत चीन, जर्मनी, कोरिया, जपान या ठिकाणी उद्योजकांनी यशस्वी दौरे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
दि. 22 ते 29 एप्रिल या दरम्यान हा अभ्यास दौरा आहे. प्रदर्शनाला जाणाऱ्या उद्योजकांनी त्यांना उपलब्ध झालेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून जगातील ज्ञान अवगत करावे व या ज्ञानाची देवाणघेवाण येथील उद्योग व्यवसायांच्या भराभराटीसाठी उपयोगात आणावी, असे सांगितले.
उपाध्यक्ष दौलतराव शिंदे म्हणाले की, 70 ते 80 देशांतील उद्योजक या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र असल्याने त्यांच्यात देवाणघेवाण होते. मॅकेनिकल, इलेक्‍ट्रीकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, रोबोटस, ऍटोमेशन या क्षेत्रातील नवनवीन अत्याधुनिक मशिनरीचे प्रात्यक्षिके व प्रदर्शन पहावयास मिळेल. व्यावसायिक भागीदारीसाठी याचा उपयोग होईल, असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)