व्यक्‍तीपूजा नको, धर्मावर श्रद्धा ठेवा!

चातुर्मास प्रवचन ः उपप्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांचे मार्गदर्शन
भोसरी – श्रद्धा आपल्या धर्मावर ठेवा, कोणा व्यक्‍तीवर नको. कोणतीही व्यक्‍ती, साधू, नेहमीच बरोबरच असेल, त्यांची चूक होणारच नाही, असे शक्‍य नाही. त्यामुळे आपण व्यक्‍तीपूजक होण्याऐवजी धर्मावर श्रद्धा ठेवा, असे मार्गदर्शन उपप्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी चातुर्मास प्रवचनात केले.
भोसरी येथील श्री वर्धमान श्रावक संघाच्या तत्त्वाधानात आयोजित चातुर्मास महोत्सवात दैनंदिन प्रवचन देताना उपप्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. बोलत होत्या. प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना साध्वी म्हणाल्या, आपण कोणत्याही धर्माचे उपासक असलात तरी चालेल. कारण कोणताही धर्म वाईट आचरण शिकवत नाही. भगवान महावीर स्वामींनी सांगितले जगा आणि जगू द्या, हाच विचार वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या प्रकारे सर्व धर्मांमध्ये सांगितला आहे. त्यामुळे आपण व्यक्‍तीपूजक असू नये. त्या व्यक्‍तीचा, धर्मात्माचा आदर ठेवा, भक्‍ती ठेवा परंतु पूजक होऊ नका. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये हेच सांगितले आहे. मत आणि भावना एक असावी. वेळेची उपयोगिता जाणून घेऊन त्याप्रमाणे आपले आचरण ठेवा.
प्रत्येक आत्मा आपल्या साधनेच्या जोरावर परमात्मा बनू शकतो. हा भगवान महावीरांचा संदेश जैन बांधवांनीच नाही तर समस्त समाजाने स्विकारला पाहिजे. संयत आचरण करणारे विशिष्ट साधनेद्वारे ज्ञान प्राप्त करणाऱ्या जैन धर्मात तीर्थंकर परमात्मा म्हणून सन्मान केला जातो. अहंकारापासून अलिप्त राहिल्यास परमात्मा आणि गुरुची सेवा करण्याची योग्यता प्राप्त करणे शक्‍य होते.
श्री आनंदऋषीजी महाराज जन्मजयंती
श्री वर्धमान श्रावक संघाच्या वतीने आचार्य भगवंत श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या जन्मजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाच ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान अष्टदिवसीय महोत्सवातंर्गत विविध कार्यक्रमांनी जन्मजयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये गुरुपौर्णिमा व माता-पिता पूजन रविवार (दि.5) रोजी सकाळी 9 ते 10.30 दरम्यान होणार आहे. सामुयिक जाप, आयंबिल, उपवास आदी कार्यक्रमांचे आयोजन श्री वर्धमान श्रावक संघातर्फे करण्यात आले. या महोत्सवाच जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, गिरीष मुथियान, सागर सांकला, विजय कर्णावट, शांतीलाल शाळ, राजेंद्र बांठिया, सुशिल मुथा, सुभाष डुंगरवाल, विजय पारख, किरण कटारिया, डॉ. जवाहर भळगट, डॉ. प्रदीप गांधी, महिला अध्यक्षा अस्मिता गुगळे आदींनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)