व्यक्तीचा समग्र विकास हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असावा- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : व्यक्तीचा समग्र विकास साधणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असावा आणि त्याच्या मेंदू आणि हृदयामध्ये चांगल्या गुणांचा वास असला पाहिजे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. ते  मिझोरममधील आयझॉल येथील मिझोरम विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

योग्य पायाभूत सुविधा दर्जात्मक शिक्षणासाठी चांगली परिस्थिती निर्माण करतात असे उपराष्ट्रपती म्हणाले. भविष्यातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी स्वत:ची प्रगती केली पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ नवीन ज्ञान देणे एवढाच शिक्षणाचा उद्देश नसावा तर त्यांना असे कौशल्य प्रदान करावे जेणेकरून ते भविष्यात त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतील.

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे न होता उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असा सल्ला यावेळी उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांसोमर करिअरचे अनेक रस्ते आहेत परंतु विद्यार्थ्यांनी त्यांना आवड असणाऱ्या क्षेत्रात काम करावे असेही उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)