व्यक्तिमत्व घडविण्यासाठी युवा महोत्सव उत्कृष्ट व्यासपीठ : राजे घाटगे

पुसेगाव – ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठी उर्जा असून आपले व्यक्तीमत्व घडवण्यासाठी व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सेवागिरी देवस्थान ट्रस्टने युवा महोत्सवाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून युवकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याच्या वित्त विभागाचे उपसचिव व बुधचे सुपुत्र वैभव राजेघाटगे यांनी केले.

श्री सेवागिरी महाराजंच्या यात्रेनिमित्त सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित युवा महोत्सवाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मठाधिपती सुंदरगिरी महाराज, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवा उद्योजक महेश वाघ, जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्रा. सुधीर इंगळे, प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्राचार्य कोकरे, प्राचार्य डी. पी. शिंदे, मुख्याध्यापिका संध्या चौगुले, विश्‍वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, युवा महोत्सव संयोजन समितीचे सचिव प्रा. संजय क्षीरसागर तसेच बाळासाहेब जाधव, गुलाबराव जाधव, एम. आर. जाधव उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे म्हणाले, सेवागिरी ट्रस्ट सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहे. समाजोपयोगी कार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या या ट्रस्टच्या शैक्षणिक कार्याला आपले सदैव सहकार्य राहिल.
सहायक धर्मादाय आयुक्त ईश्‍वर सुर्यवंशी म्हणाले, धार्मिक कार्यबरोबरच सामाजिक बांधिलकीने समाजोपयोगी कार्य करणाऱ्या सेवागिरी ट्रस्टने सामुदायिक विवाह सोहळे, गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना अर्थसहाय, जलसंधारण, नदी पुनरुज्जीवनासारखी कामे करुन इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे. रोहित पवार म्हणाले, युवकांनी शिक्षणाबरोबरच खेळांना व कलेला महत्व देऊन पुस्तकी ज्ञानाशिवाय अवांतर ज्ञान प्राप्त करावे.

नोकरी मिळाली नाही तरी निराश न होता स्वतःचा व्यवसाय उभारावा. समाजकारण करण्यासाठी राजकारणातही अभ्यासू युवकांनी पुढे आले पाहिजे. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, युवा शक्तीला विधायक दिशा मिळावी, ग्रामीण भागातून चांगले कलाकार पुढे यावेत व युवकांद्वारे समाजप्रबोधन होऊन समाजालाही विधायक दिशा मिळावी, त्याद्वारे समाज प्रगतीशील व्हावा म्हणून दरवर्षी युवा महोत्सवाचे सेवागिरी ट्रस्ट आयोजन करते. मोहन गुरव यांनी सुत्रसंचालन केले. विश्‍वस्त प्रताप जाधव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)