व्यक्तिमत्व खुलवतात सुंदर चपला, सॅंडल

कपड्यांसारखाच चप्पल सॅंडलचा शौकही खूप जणींना असतो. आजकाल युवती मॅचिंग चपला बऱ्याच वापरतात. त्यामुळे कपड्यांप्रमाणेच अशा चप्पल बूटांनी अख्खं कपाट भरलेलं असतं. मार्केटमध्येही खूप रंगीबेरंगी चपला बघायला मिळतात. ऋतुमानानुसारही चपलांचा प्रकार बदलला जातो. उन्हाळ्यात, पावसाळ्यात हिवाळ्यात त्या त्या हवामानाला झेपेल असेच चपला बूट वापरावे लागतात.

टिकाऊ व आरामदायी तितक्‍याच सुंदर चपलांची किंवा सॅण्डलची निवड करणं हे अतिशय कठीण काम आहे. त्यामुळेच पादत्राणं, चप्पल किंवा बूट खरेदी करताना त्यांच्याविषयी आवश्‍यक ती माहिती असणं गरजेचं ठरतं. त्यासाठी…

बाहेरून तरी ती आकर्षक दिसली पाहिजे. चप्पल किंवा बूट खरेदी करताना त्यांचं सौंदर्यदेखील तितकंच महत्त्वाचं असतं हे लक्षात ठेवा. पायांना नुसता आराम मिळावा म्हणून पादत्राणं नसतात तर त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात देखील भर पडली पाहिजे. म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप व सुंदर अशा चपलांची निवड करा. पादत्राणांची खरेदी स्वत:च करावी. कधीही कुणाच्या चपलेच्या मापावरून खरेदी करू नये.

चपला, बूट नेहमी चांगल्या व विश्वसनीय दुकानातूनच खरेदी करा. खरेदी करताना त्यांच्या मजबुतीकडे विशेष लक्ष द्या. नेहमी प्रतिष्ठित कंपनीची आणि चांगल्या दर्जाच्या चपला विकत घ्या. कारण त्या जास्त दिवस टिकतात.

आपल्या सॅंडल बूटवरील नक्षीकाम नेहमी नीट पारखून घ्या. कधी कधी वरून त्या लवकर खराब होतात. परिणामी, पादत्राणं मजबूत असूनदेखील खराब दिसू लागतात. म्हणून दिखाऊ चपला घेऊ नका.

चपला खरेदी करीत असताना दुकानात थोडा वेळ चालून पाहा. चपला घातल्यानंतर चालणं आरामदायी वाटतं की नाही हेदेखील तुम्हांला कळेल. पायात घट्ट बसणाऱ्या सॅण्डल कधीही खरेदी करू नका. कारण त्यामुळे पायांना त्रास होतो. चपला किंवा सॅण्डल खरेदी करताना त्यांचा मजबूतपणा, सजावट आणि त्यांची स्वच्छता करण्याची पद्धत नीट समजून घेऊन मगच खरेदी करा. त्याचबरोबर पादत्राणं खरेदी करताना ऋतूची अनुकूलतादेखील लक्षात घ्या. जसे, खास उन्हात वापरण्यासाठी बनविलेल्या हवेशीर अशा सॅण्डल व चपलांची निवड करा, जेणेकरून चपलांमधील हवा खेळती राहील.

फॅशननुसार चप्पला किंवा सॅण्डल वापरणं अधिक योग्य राहील. कधीही जास्त “हिल’वाल्या सॅण्डल किंवा चपला वापरू नका. यामुळे कंबरदुखीसारखे आजार मागे लागण्याची शक्‍यता असते. अधिक शक्‍यता असते. अशा प्रकारच्या चपला घालून चालताना पाय सरकून तो मुरगळण्याची अधिक शक्‍यता असते.

वेगवेगळ्या रंगांतील चप्पल बुटांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पॉलीश करताना त्याच रंगाचं पॉलीश आणि वेगवेगळ्या ब्रशचा वापर करावा.

अशा ह्या सुंदर सुंदर चपला आपले व्यक्तिमत्त्व खुलवतात पण त्यांची खरेदीही तितकीच जपून करावी.

– सुजाता टिकेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)