व्यंकटेशकृपा साखर कारखान्याला आग

सुमारे साडेतीन कोटी रूपये नुकसानीचा अंदाज

शिक्रापूर – जातेगाव बुद्रुक (ता.शिरुर) येथील व्यंकटेशकृपा साखर कारखान्याला शुक्रवारी (दि.30) दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये बगॅज, इलेक्‍ट्रीकल केबल आणि मशीन्स यालाही झळ बसली. या आगीमध्ये कारखान्याचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी वर्तविला आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे शुक्रवारी (दि.30) दुपारी 2 च्या सुमारास व्यंकटेशकृपा या कारखान्यात बगॅजला आग लागली. या आगीची तीव्रता वाढत गेली. याची झळ मुख्य प्लॅटलाही लागली. कारखान्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर बगॅज साठवण्यात आले होते. एका ट्रकच्या सायलेंसरमधून ठिणगी उडून आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कामगारांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली. यावेळी पुणे महानगरपालिका, राजगुरुनगर परिषद आणि एमअयडीसीचे अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशीरा र्यंत आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. तौर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य प्लॅंट थोडक्‍यात बचावला. कारखान्याच्या छपरावरील प्लॅस्टीकचे पत्रे जळाले. तसेच काही मशीनरींना झळ बसली. इलेक्‍ट्रीकल केबल असे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आगीचे वृत्त समजताच कारखान्याचे अध्यक्ष संदीप तौर, माजी आमदार अशोक पवार, सभापती सुजाता पवार, बाजार समितीचे सभापती शशीकांत दसगुडे आदी घटनास्थळावर दाखल झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)