वोडाफोन आयडियाची पेटीएमबरोबर भागीदारी 

नवी दिल्ली: भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी असलेल्या वोडाफोन आयडिया लिमिटेडने आपल्या प्रीपेड ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण सेवा देण्यासाठी भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या पेटीएमबरोबर भागीदारी करत असल्याचे आज जाहीर केले. या भागीदारीमुळे वोडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांना पेटीएमद्वारे रिचार्ज केल्यावर विशेष कॅशबॅक ऑफर आणि आकर्षक वाऊचर्स मिळणार आहेत.
वोडाफोन आणि आयडिया प्रीपेड ग्राहक, जे पहिल्यांदाच पेटीएमद्वारे व्यवहार करतील, त्यांना कमीत-कमी 149 रुपयांच्या पेटीएमने केलेल्या रिचार्जवर 25 रुपयांची कॅशबॅक मिळेल तर पेटीएमचा आधीपासून वापर करत असणाऱ्यांना 20 रुपयांची कॅशबॅक मिळेल. जोडीला ग्राहकांना 375 रुपयांची वाऊचर्स पेटीएमकडून मिळणार असून पेटीएम मॉलवर चित्रपटांची तिकिटे काढण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी त्यांचा उपयोग करता येणार आहे.
अधिक चांगल्या भविष्याच्या उभारणीसाठी लाखो नागरिकांना डिजिटल क्रांतीला जोडून घेताना खराखुरा डिजिटल भारत निर्माण करण्यासाठी वोडाफोन आयडिया लिमिटेड कटिबद्ध आहे. त्यातून वोडाफोन आणि आयडिया या लोकप्रिय व आवडत्या ब्रॅंडस्‌च्या आधारे गुणात्मक उत्पादन आणि सेवा यांच्या माध्यमातून डिजिटल अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल व्हायला चालना मिळेल.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)