वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचा भारतविरोधी घोषणाबाजीचा फ्लॉप शो

नवी दिल्ली: वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासासमोर पाकिस्तानने रचलेला भारतविरोधी घोषणाबाजीचा शो फ्लॉप गेला आहे. परदेशात भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान नेहमीच करत असते. खलिस्तानवादी एसएफजे (शीख फॉर जस्टिस) च्या कार्यकर्त्यांना पुढे करून पाकिस्तान वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावाससमोर घोषणाबाजी करणार असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दूतावसाला दिली होती.

त्यानंतर भारतीय दूतावासासमोर भारतमाताकी जय अशा घोषणा देणारे शेकडो लोक जमा झाले. त्यांच्यासमोर पाकिस्तान समर्थित भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य भासू लागली. अशा घोषणा देण्यासाठी जमा झालेल्यांची संख्या जेमतेम 20 होती आणि त्यात पाकिस्तानीच जास्त होते. उलट भारतमाता की जय घोषणा देणारांत शीख समुदाय मोठ्या संख्येने होता. असाच प्रयत्न पाकिस्तानने लंडनमध्येही केला होता. एकीकडे करतारपूर कॉरिडॉरला अनुमती देऊन शीख समुदायात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतानाच दुसरीकडे खलिस्तानवाद्यांना प्रोत्साहन देत पाकिस्तान आपले दुटप्पी धोरण जाहीर करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताविरुद्ध मोहीम चालवणाऱ्या शीख फॉर जस्टिस-एसएफजेची मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने बंद केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ती बंद करण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)