वॉल्टींग आणि ग्रॅंडहोमने सावरला न्युझिलंडचा डाव; इंग्लंडकडे 115 धावांची आघाडी

ख्राईस्टचर्च – न्युझिलंड आणि इंग्लंड दरम्यान होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ इंग्लंडच्या गोलंदाजांनी गाजवला. इंग्लंडच यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळी नंतर स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांच्या धारदार गोलंदाजी मुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा न्युझिलंडने 6 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली होती. 5 बाद 36 धाव संख्येवरुन ब्रॅडली वॉल्टींग आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी 142 धावांची भागीदारी करत न्युझिलंडचा डाव सावरला.

तत्पुर्वी इंग्लंडने कालच्या आठ बाद 290 धावांवरुन पुढे फलंदाजी करताना धावसंख्येत आणखीन 17 धावांची भर घालत सर्वबाद 307 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा नाबाद 97 धावांवर फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने आपले शतक पुर्ण केले. शतक पुर्ण होताच बेअरस्टो बाद झाला. बेअरस्टोने 170 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 101 धावा केल्या. न्युझिलंड कडून टीम साऊदीने 62 धावा देत 6 गडी बाद केले तर ट्रेंट बोल्टने 87 धावा देत 4 गडी बाद केले.

इंग्लंडचे 308 धावांची आव्हाण घेऊन उतरलेल्या न्युझिलंडची सुरुवात निराशाजनक झाली त्यांचा सलामीवीर टॉम लॅथमहा भोपळाही न फोडता तंबूत परतला तर दुसरा सलामीवीर जीत रावल केवळ 5 धावा करुन बाद झाला. तर त्यांचे पाच फलंदाज केवळ 36 धावातच तंबूत परतले होते. ज्यात न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोलस या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. न्युझिलंडचा संघ धावांची शंभरी देखील गाठेल की नाही अशी परिस्थीती निर्माण झाली असताना ब्रॅडली वॉल्टींग आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी डावात आणखीन पडझड न होऊ देता.

खेळपट्टीवर नांगर टाकत सहाव्या गड्या साठी महत्वाची भागीदारी नोंदवायला सुरुवात केली. ब्रॅडली वॉल्टींग आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी सहाव्या गड्या साठी 142 धावांची भागीदारी नोंदवत न्युझिलंडची धावसंख्या 178 धावांपर्यंत नेली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यास 5 षटके बाकी असताना कॉलिन डी ग्रॅंडहोम बाद करत ब्रॉडने ही जोडी फोडली. ग्रॅंडहोमने 151 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा ब्रॅडली वॉल्टींग हा 77 धवांवर खेळत होता तर टीम साऊदी हा 13 धावांवार खेळत होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)