वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करारास पुण्यातूनही विरोध

ग्राहक पंचायत समितीचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे – अमेरिकन कंपनी वॉलमार्टकडून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट विकत घेण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांच्या विक्री आणि व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने संपूर्ण देशभर या गोष्टीला विरोध केला जात आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पंतप्रधानांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे. पुण्यातही याबाबतचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना देण्यात आले.

यावेळी सूर्यकांत पाठक, शैलेश राणीम, उदय जोशी, तुषार गायकवाड, किरण गुंजाळ, थकसेन पोरे आदी उपस्थित होते. पाठक म्हणाले, ग्राहक पंचायतीतर्फे देशात अमेरिकन कंपनी वॉलमार्टकडून इंडियन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट विकत घेण्याला विरोध केला जात आहे. वॉलमार्ट ही चिनी वस्तूंची अमेरिकन विक्रेता कंपनी आहे. या कंपनीमधून मिळणारा नफा अमेरिकेत जाणार आहे. चिनी लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या “मेक इन इंडिया’च्या स्वप्नाला बाधा पोहोचणार आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत संपूर्ण भारतात जिल्ह्यांधिकाऱ्यांना निवेदने देत असून, अशा प्रकारच्या बेकायदा खरेदीला त्वरित थांबवाने, अशी मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. या व्यवहारामुळे देशातील लोकांचा रोजगार हिरावले जातील. स्वस्त दरात माल खरेदी केल्याने शेतकऱ्यांचे देखील नुकसान होणार असून, महाग दरात माल विकल्यावर ग्राहकांचे नुकसान होईल. तसेच देशातील लघु उद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय बंद पडेल. त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे, असे पाठक यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

1 COMMENT

  1. Make in India या कार्यक्रमाला खीळ बसेल…
    पण FDI हा देखील त्याच नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे! त्याला हातभार लागेल…

    त्यामुळे फार काळजी करू नका…
    सगळे राष्ट्र-कर्मच चालले आहे!?

    बोला मोदी महाराज की जय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)