वॉलमार्टमध्ये नौकरीची संधी… ‘एवढ्या’ जागा भरल्या जाणार 

नवी दिल्ली: ऍमेझॉनकडून मिळणाऱ्या वाढत्या स्पर्धेमुळे जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट एक हजारपेक्षा अधिक तंत्रज्ञांची भरती करणार आहे. कंपनीकडून पहिल्यांदाच तंत्रज्ञान क्षेत्रात भरती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वी कंपनीने उत्तर प्रदेशात 15 घाऊक कॅश ऍण्ड कॅरी स्टोअर्स उभारणार असल्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात 30 हजार रोजगारनिर्मिती करणार असल्याचे सांगितले होते.
तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीच्या 1,800 कर्मचाऱ्यांसह बेंगळुरू आणि गुरुग्राममध्ये कामकाज सुरू आहे. भारतातील वाढत्या आयटी क्षेत्राचा कंपनीला लाभ घ्यायचा आहे. आम्ही जास्तीत जात उत्पादनक्षमतेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सर्व प्रकल्पावर काम करत असून भारतीयांना अधिकाधिक लाभ होतील याचा प्रयत्न करण्यात येत आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स्वर जास्त भर देण्यात येत आहे असे वॉलमार्टचे प्रमुख माहिती अधिकारी क्‍ले जॉन्सन यांनी म्हटले. तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणाऱया कंपन्यांमध्ये वॉलमार्टचा समावेश आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)