वॉर्नर ऐवजी ऍलेक्‍स हेल्सचा सनरायजर्स मध्ये समावेश

नवी दिल्ली  – बॉल टॅम्परिंग प्रकरणात वर्षभराच्या बंदीची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर आयपीएलमध्ये वॉर्नरची जागा कोण घेणार यावर बराच उहापोह सुरु झाला. डेव्हिड वॉर्नरने सनराईजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी संघ व्यवस्थापनाने इंग्लंडच्या ऍलेक्‍स हेल्सला आपल्या संघात समाविष्ट केलं आहे. उपलब्ध खेळाडूंच्या यादीतून हैदराबादने 1 कोटी रुपयांची किंमत मोजत हेल्सला वॉर्नच्या जागी पर्याय म्हणून संघात दाखल करुन घेतलं आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर वॉर्नरने हैदराबादच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता.

सनराईजर्स हैदराबाद संघाने ऍलेक्‍स हेल्सच्या निवडीची बातमी आपल्या ट्‌विटर अकाऊंटवरुन सांगितली आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं. वॉर्नरसोबत  ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान ऍलेक्‍स हेल्सला आपल्या संघात समाविष्ट करण्यापुर्वी हैदराबाद संघ व्यवस्थापन समितीने श्रीलंकेच्या कुशल परेराला संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचं समोर आलं होतं. मात्र कुशल परेराने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आपला नकार दर्शवला आयपीएलमध्ये खेळण्या ऐवजी कुशल परेराने श्रीलंकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास पसंती दर्शवली.

आयपीएलऐवजी श्रीलंकेच्या कसोटी संघात आपली जागा पक्की करण्यासाठी परेराने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. 2016 साली कुशल परेराने श्रीलंकेकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर त्याला लंकेच्या कसोटी संघात जागा मिळवता आलेली नाहीये. त्यामुळे कुशलने घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)