कुलदीपने कसोटी क्रिकेटमध्ये केलेले पदार्पण गाजले. धरमशाला येथे गेल्या वर्षी झालेल्या कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावांत 68 धावांत 4 बळी घेतले. त्यानंतर त्याला केवळ एक कसोटी सामना खेळायला मिळाला आहे. परंतु पुढच्या महिन्यांत अफगाणिस्तानविरुद्ध रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कुलदीपची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर इंग्लंडच्या आगामी दौऱ्यासाठीही त्याचा भारतीय संघात समावेश आहे. इंग्लंडचा दौरा कोणत्याही खेळाडूसाठी आव्हानात्मक असतो. त्यामुळेच शेन वॉर्नने या दौऱ्यासाठी आपल्याला बहुमोल टिप्स दिल्या असल्याचे सांगून कुलदीप म्हणाला की, राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर मी त्याच्याशी चर्चा केली.
इंग्लंड दौऱ्यासाठी मी तयारी सुरू केली असल्याचेही त्याला सांगितले. आता आयपीएलनंतर पुढच्या भेटीत मी त्याच्याशी सविस्तर चर्चा करू शकेन. इंग्लंडविरुद्ध शेन वॉर्नची कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी नेहमीच मोलाची ठरली होती. त्यामुळे मलाही त्याच्या सल्ल्याचा निश्चितच उपयोग होईल. – कुलदीप
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा