वॉरेन बफेट करणार पेटीएम मॉलमध्ये गुंतवणूक

नवी दिल्ली: पेटीएम या डिजीटल सेवा देणाऱ्या भारतातील कंपनीत बर्कशायर हॅथवे कंपनी गुंतवणूक करणार आहे. पेटीएम कंपनीला वन 97 ही कंपनी चालविते. या कंपनीचे 3 ते 4 टक्‍के इतके भागभांडवल वॉरेन बफेट संचलित बर्कशायर हॅथवे कंपनी विकत घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत दोन्ही कंपन्याकडून कोणी जाहीरपणे बोलायला तयार नाही. कारण बोलणी अनौपचारिक आणि प्राथमीक पातळीवर असल्याचे बोलले जात आहे.

मात्र तरीही पुढील काही दिवसात याबाबत जाहीर घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर भारतील डिजीटल पेमेंट मोहिमेला मोठी चालणा मिळणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. पेटीएमबाबत जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार कमालीचे आशावादी आहेत. भारतातील बदलणारी व्यवहार व्यवस्था पाहून विजय शंकर शर्मा यांनी ही कंपनी चालू केली आहे. तिला सुरुवातीपासून भांडवलाची वाणवा जाणवली नाही. या कंपनीत स्वॉफ्टबॅंक, अलीबाबा समुह आणि ऍण्ट फायनान्सीयलची गुंतवणूक मिळालेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वॉरेन बफे या अगोदर तंत्रज्ञान कंपन्यात फारशी गुंतवणूक करीत नसत. त्याच्यातील गुंतागुंत मला अजिबात समजत नाही. आणि जी बाब आपल्याला समजत नाही तीच्यात गुंतवणूक करणे बरोबर नसल्याचे त्यांचे मत होते. मात्र 88 वर्षीय बफे यांचे मत आता बदलू लागले आहे. त्यांनी या अगोदर ऍपल आणि उबेर कंपन्यात चांगलीच गुंतवणूक केली असून आता भारतातील तंत्रज्ञान कंपनीतही ते गुंतवणूक करण्याची शक्‍यता आहे. बफे यांच्यासारख्या ख्यातनाम गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केल्यास इतर गुंतवणूकदारही भारताकडे वळण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)