“वॉन्टेड’ अमीन शेख जेरबंद!

  • देहूरोड पोलिसांची कामगिरी : 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

देहुरोड – पोलिसांना गुंगारा देऊन गेली तीन वर्षे फरार असलेला सराईत गुंड आणि देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा माजी उपाध्यक्ष अमीन शेख याला देहूरोड पोलिसांनी सोमवारी (दि. 23) सायंकाळी जेरबंद केले. वडगाव न्यायालयात त्याला आज, मंगळवारी हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमीन मेहबूब शेख (वय 51, रा. मेन बाजार पेठ, देहूरोड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षा एकाला पळवून नेवून मारहाण प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात क्र.42/2015 गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो फरार होता. सोमवारी सायंकाळी तो देहुरोड परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला सापळा लावून अटक केली. त्यावर प्राणघातक हल्ला, लुटमार, मारामारी, धमकावणे आदी वेगवेगळ्या स्वरुपाचे सुमारे 32 गुन्हे दाखल आहेत.

तसेच अन्य 7 ते 8 गुन्ह्यांत तो पोलिसांना “हवा’ होता. याशिवाय 42/15 हा 15 वर्षांपूर्वीचा गुन्हा आणि 364 अन्वये कारवाई करून त्याला जेरबंद केले. खून करण्याच्या उद्देशाने पळवून नेणे, मारहाण आदी गुन्हेही शेख याच्यावर दाखल असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली.

वडगाव मावळ न्यायालयात अमीन शेखला मंगळवारी हजर केले असता न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली. या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विनोद घोळवे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)