वॉटर कप 2019 स्पर्धेची घोषणा

स्पर्धेत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील 76 तालुक्‍यांचा सहभाग

सातारा  महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी “पानी फाउंडेशन’च्या वतीने “सत्यमेव जयते वॉटर कप 2019′ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली. राज्यातील जल संवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. हे व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या बैठकीत सामील झाले.

पुढील वर्षी 8 एप्रिल ते 22 मे 2019 दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे 75 लाख रु., 50 लाख रु. आणि 40 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त,प्रत्येक तालुक्‍यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला10 लाख रुपयांचेबक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या एकूण बक्षिसांची रक्कम रु. 9.15 कोटी राहणार आहे. स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या वतीने “पाणलोट विकासा’चे प्रशिक्षण लोकांना देण्यात येते.

45 दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत39;श्रमदान39;, पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील. ज्यामुळे जमीनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्‍यातील प्रत्येक महसूली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरणाऱ्या आमिर खान आणि त्यांच्या सुविद्य पत्नी किरण राव, सत्यजित भटकळ आणि पानी फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेच्या चौथ्या सत्रासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. या स्पर्धेला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन ही अखेरीस केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)