वॉटर कप स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे ः शिंदे

कलेढोण : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तालुका समन्वयक बाळासाहेब शिंदे.

कलेढोण, दि. 1 (प्रतिनिधी) – कलेढोण, ता. खटाव येथे होणाऱ्या 2019च्या वॉटर कप स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयातील आयोजित पाणी फौंडेशनच्या विशेष कार्यक्रमात तालुका समन्वयक बाळासाहेब शिंदे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या पालकामध्ये समाजामध्ये गावामध्ये पाणी फौंडेशनच्या काममध्ये सहभागी होवून जलसंधारण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा, वृक्षारोपण व संवर्धन व शोषखड्डे या सारख्या उपचार पद्धतीने पाणी जमिनीमध्ये कसे मुरवता येते, लोकसहभाग कसा वाढवता येतो या संदर्भात माहिती व मार्गदर्शन केले. त्याचबरोबर तालुका समन्वयक साबळे, सामाजिक जनजागृती विभागाच्या मेघा शिंदे, प्रियांका डावरे, अतुल पवार, माने सर, यांनी जनजागृती समाजातील घटकांचा तसेच लोकसहभाग अगदी आपल्या घरापासून कसा वाढवता येईल, जास्तीत जास्त पाणी कसे अडवून जमिनीमध्ये मुरवता येईल आणि येणाऱ्या 2019च्या वॉटर कप स्पर्धेत कलेढोण गावला कशा पद्धतीने यशस्वी करता येइल, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
संजीव साळुंखे, रमेश पाटील, यशवंत माळी, अनिल दबडे, राजेंद्र भूषारी, बाळासाहेब दबडे, अण्णा शेटे, राजेंद्र लोखंडे, सोमनाथ शेटे, सौ. रेखा शेटे आणि मुख्यध्यापक देशपांडे, पर्यवेक्षक जाधव सर व सर्व शिक्षक-शिक्षक आणि कर्मचारी व सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)