वॉटर कप स्पर्धेत “प्रभात’चा गौरव

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील 37 गावांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेत अखंड तालुका पाणीदार केला. यामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, कार्यकर्ते यासह या स्पर्धेचे वार्तांकन करणाऱ्या विविध माध्यमांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. वॉटर कप स्पर्धेचे वार्तांकन करीत ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यात दैनिक “प्रभात’ प्रिंट माध्यमात सर्वोत्कष्ट ठरला. गाव पाणीदार होत असल्याची बित्तम्‌ बातमी देवून या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रभातचे प्रतिनिधी निलकंठ मोहिते यांनाही विशेष प्रमाणपत्र देत यावेळी सन्मानित करण्यात आले. इंदापूर येथील लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे, तहसिलदार श्रीकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी सुर्यभान जाधव, पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांच्यासह तालुक्‍यांतील विविध गावचे सरपंच, सदस्य, पत्रकार, भूमिपुत्र यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)