वॉटर कपमुळे जलसंधारणाच्या कामात क्रांती

वाघमोडेवाडी ः कार्यक्रमात मोफत मातीपरिक्षण करून दिल्याबद्दल विनय पोळ यांचा सत्कार करताना ना.रामराजे ना.निंबाळकर.

ना. रामराजे नाईक-निंबाळकर : दुष्काळी जनतेच्या पाठीशी खंबीर

बिजवडी, दि. 12 (वार्ताहर) – दुष्काळी माण-खटाव तालुक्‍यातील बहुतांश गावांनी पाणी फौंडेशनच्या स्पर्धा काळात जलसंधारणाच्या कामात मोठी क्रांती केली आहे. मी राजकारणातील 25 वर्षे या दुष्काळी तालुक्‍यांसाठी घालवली आहेत. सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत. तुम्ही सर्वजण भीषण परिस्थितीचा सामना करताय, पण परिस्थितीला घाबरून जावू नका. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहून परिस्थिती निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी केले आहे.
वाघमोडेवाडी, ता. माण येथे वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी गावांचा सन्मान आणि दातृत्वाचा कृतज्ञता सोहळा व विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, माजी आ. दिपकराव साळुंखे, प्रभाकर घार्गे, शिवाजीराव सर्वगौड, जि. प. सदस्या सौ. भारती पोळ, सौ. सोनाली पोळ, सभापती रमेश पाटोळे, आयुक्त नितीन वाघमोडे, संदीप मांडवे, अनुराधा देशमुख, हर्षदा जाधव-देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, माण तालुक्‍यात पाणी फौंडेशनच्या माध्यमातून चांगली कामे झाली आहेत. तथापि, राज्य सरकार स्वत:चे डोक वापरत नसून केंद्राच्या अकलेप्रमाणे वागतय. आपल राज्य बळीच राज्य असावं, उद्योगपतीचे नसावे.
प्रभाकर देशमुख म्हणाले, वॉटर कप स्पर्धेत सर्वांनी श्रमदान केलेय. श्रमदानातून एक वेगळीत ऊर्जा तयार झाली त्यातूनच तालुक्‍याला वॉटर कप मिळाला आहे. माणला दुष्काळ जाहीर झाला मात्र चूकीच्या धोरणामुळे खटाव तसाच राहीला असून तोही दुष्काळी जाहीर होणे गरजेचे आहे.
खा. विजयसिंह मोहिते-पाटील, प्रभाकर घार्गे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दादासो मडके यांनी केले. सुत्रसंचालन अमोल काटकर व इंद्रायणी जवळ यांनी केले. संदीप सुळे यांनी आभार मानले.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)