वैष्णवी साळुंखेचे राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत यश

फलटण – दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत फलटण येथील वैष्णवी महेश साळुंखे हिने 19 वर्षाखालील कंपाऊंड राउंड प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. वैष्णवी फलटण येथील शिवाजीराजे इंग्लिश मिडियम सीबीएसईची माजी विद्यार्थिनी असून, सध्या एस. पी. कॉलेज पुणे येथे बारावीत शिकत आहे. कंपाउंड राउंड प्रकारात वैष्णवीने मिळवलेले यश फलटण मधील शालेय खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे. त्यामुळे फलटणमध्ये तिचे विशेष कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)